पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/११४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्यसनाला वेसण ‘आपल्या कुटुंबातील कोणी व्यसनी आहे का?' या प्रश्नाचे उत्तर 'होय' असे असेल तर पुढील मजकूर वाचून आपण त्यावर गांभीर्याने विचार करायला हवा; नव्हे, त्याप्रमाणे अंमल करायला हवा. प्रश्नाचे उत्तर 'नाही' असे असेल तर पुढचा मजकूर वाचल्यानंतर 'पुन्हा एकदा ' हाच प्रश्न आपण स्वतःला करायला हवा. याचे कारण असे की वारंवार चहा-कॉफी पिणे, तंबाखूची मिशेरी लावणे, तंबाखूमिश्रित पेस्ट वापरणे, वरचेवर बिडी किंवा सिगरेट ओढणे, झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेणे, एवढेच नव्हे तर जेवणापूर्वी नियमितपणे उंची विदेशी दारू घेणे या प्रकारांना बरेच 'सुज्ञ' व्यसन म्हणायला तयार नसतात. आपल्याला किंवा आपल्या कटुंबातील व्यसनाला वेसण । ११३