पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/११७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समाजातही स्थान नसते आणि कुटुंबातही. कुटुंबातल्या व्यसनी व्यक्तीमुळे कुटुंबातील सर्वांचे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील स्थान अनिश्चित होते, दिशाहीन होते. - कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनी असेल तर सान्या कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडते आणि दुर्दैवाने कुटुंबकर्ताच जर व्यसनी असेल तर कुटुंबातील इतरांची- विशेषत: मुलामुलींची - अक्षरश: वाताहात होते. पत्नीला संसारगाडा चालवावा लागतो. समाजात मानहानी पदरी पडते; मुलामुलींचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होतो. आपल्या देशातील मुलींचा विवाह आजही प्रामुख्याने आईवडीलच ठरवितात. त्यातच वडील ज असतील तर प्रसंगी आधीच दारूला गहाण असलेला मेंदू ते पुन्हा एकदा विकतात आणि मुलीला आयुष्याच्या अंधारखायीत लोटतात. मुलीही बिचाऱ्या स्वत:ला झोकून देतात. नशिबाचा प्रकाश क्वचित मिळतो. अन्यथा आयुष्यात सर्वत्र काळोखच भरून उरतो. दारूड्या बापाला यातले काहीच दिसत नसते. कारण डोळे दारूने भरलेले असतात; मेंदू मरणासन्न झालेला असतो. आया तर गांधारीच झालेल्या असतात, कधी समजून-उमजून तर बऱ्याचदा नवऱ्याने समज दिलेली असते म्हणून! समाजात वावरणारे हे व्यसनी लोक फक्त आपल्या कुटुंबीयांचाच बळी घेतात असे नव्हे तर समाजातल्या तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांचाही बळी घेत असतात. कारण रस्त्यावर होणारे बरेच अपघात मादक पदार्थांचे सेवन करून वाहन चालविल्याने होतात. अपघातात अशी व्यक्ती मरण पावते अथवा विकलांग होते आणि त्याचबरोबर दुसऱ्या वाहनातील, रस्त्यावरील - काहीही चूक नसलेल्या निष्पाप लोकांचे बळी जातात. हा सारा अनर्थ केवळ दारूच्या नशेपोटी होतो हे सर्वांनी वेळीच समजून घ्यायला हवे. असे म्हणतात की, आधी माणूस दारू पितो; नंतर दारू दारू पिते आणि शेवटी दारू माणसाला पिते. माणसाचे आरोग्य पिते, आयुष्य पिते. आरोग्य प्रत्येकाला हवे असते. पण आरोग्य देणाऱ्या सवयी नको असतात. (उदाहरणार्थ- १९६ । जगण्यात अर्थ आहे..