पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुंदर घर ‘आपलं घर सुंदर आहे का?' असा प्रश्न कोणी केला तर..! उत्तर देण्यापूर्वी काही क्षण कोणीही विचारात पडेल. सुंदर घराच मनातलं चित्र क्षणभर डोळ्यांसमोर येईल. सुंदर घर - छानसं सजवलेलं, नीटनेटकं, स्वच्छ, टापटिपीचं, साऱ्या सुखसोयींनी भरलेलं, डोळ्यांना सुखावणाऱ्या अंतर्गत सजावटीबरोबरच बाह्यांगानंही नटलेलं, टुमदार ! सभोवताली छानसं कुंपण... त्यात हिरवाई... अगदी चित्रातल्यासारखी. सुंदर घराच्या या चित्रात आपण पाहतो ती सारी भौतिक साधनं दारे, खिडक्या, किचन, बेसीन, पडदे, टाईल्स, पोस्टर्स, पेंटिंग्ज, त्यांची डिझाईन्स, कलर व्हरायटीज... बजेटप्रमाणे यादी वाढत जाते. या साया वस्तूंच्या गर्दीत या घरात राहणारी सुंदर घर । ११९