पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मितव्यय काटकसर ! काटकसर म्हणजे खर्च कमी करणे. काटकसर म्हणजे मितव्यय ! आजच्या विज्ञानयुगात लोकसंख्येच्या वाढीबरोबर अनेक समस्यांना तोंड देत वाटचाल करताना आपल्यापैकी प्रत्येकाने अनेक महत्त्वाच्या बाबतीत काटकसर करायला हवी. त्यातील पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. 'पाणी म्हणजे जीवन' हे सुभाषित आपण 'वाचतो' पण 'जगत' नाही. प्रत्येक जीवाला जगण्यासाठी पाणी लागते. पाणी नसेल तर वनस्पती नाही. वनस्पती नसेल तर अन्न नाही आणि अन्न नसेल तर जीवन नाही. थोडक्यात पाण्याशिवाय जीवन नाही. कपडे, स्नान, स्वच्छता इत्यादींसाठी शेकडो लिटर पाण्याची दररोज गरज असते. विविध वस्तूंच्या, ऊर्जेच्या उत्पादनापासून ते मनाला मितव्यय | १२३