पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ । जगण्यात अर्थ आहे.. आत्महत्येला पर्याय आहे "या जगण्यात आता काही अर्थ नाही. आत्महत्या करावीशी वाटते. जीवन संपवून टाकावेसे वाटते. जावं नि रुळाखाली झोकून द्यावं... असह्य झालंय हे जगणं... डॉक्टर, एक इंजेक्शन द्या मला नि टाका संपवून माझ्या आयुष्याचा प्रवाह... झोपेच्या गोळ्या घ्याव्यात आणि ही झोप अखेरची ठरावी...' हे किंवा असे विचार आपल्या मनात कधी चमकून गेलेत का? नसेल तर उत्तम. आपण या जगातील एक सुखी प्राणी (म्हणजे सुखी माणूस) आहोत. वरीलप्रमाणे एखादा विचार आपल्या मनात कधी आला असेल तर तो क्षण आठवावा. ती घटना आठवावी. ती परिस्थिती आठवावी. कदाचित आपले मन म्हणेल, नकोच ती आठवण. जखम पूर्ण भरून