पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येण्याआधी त्यावरील खपली काढली तर रक्त तर भळाभळा वाहतेच, पण खोलवर वेदनादेखील होतात. अर्थात जखम वाळल्यानंतर यातले काहीही होत नाही. लोंबकळणारी खपली आपोआप नाही पडली तर अलगदपणे बाजूला काढावीच लागते. आयुष्यातल्या अशा घटनांचे अगदी तसेच असते. घटना ताजी नि कटू असेल किंवा घटनेशी संबंधित व्यक्ती अजूनही आपल्याबरोबर असेल - ओल्या जखमेला चिकटलेल्या खपलीसारखी, तर ती आठवण, घटना मनाला वेदना देऊन जाणारी असते. अशा प्रसंगातून आपण सुखरूप बाहेर पडलो असू तर वेदनारहित दृश्यपट आपल्या नजरेसमोर तरळून जातो. जीवघेणा विचार आपल्या मनात का आला? ज्यांना आपले समजत होतो त्यांनीच धोका दिला, जवळच्या माणसांनी घात केला, कधी स्वप्नातही आले नव्हते ते नशिबी आले, प्रचंड आर्थिक नुकसान झाले, समाजात तोंड दाखविण्यासारखे काही राहिले नाही, धंद्यात मोठी खोट आली, कारखाना रातोरात बेचिराख झाला, डोक्यावरचे कर्ज प्रचंड वाढले, काहीही केले तरी संकटे पाठ सोडेनात, आपल्या हातून नको ते पाप घडले, जीवनाच्या सारीपाटातून जोडीदार दूर निघून गेला, अॅडमिशन मिळाली नाही, दुर्धर आजार नशिबी आला, घरातल्यांशी भांडण झाले, जमिनीच्या तुकड्यासाठी वितंडवाद झाले, आर्थिक व्यवहारातून मोठे वाद झाले, पोटच्या मुलांनी लाथाडले, 'जीव दे' असे घरातलेच रागाने म्हणाले, वडील खूप भडकले, परीक्षेत अपयश आले, मनावर प्रचंड ताण आला, काय करावे सुचेना, रडू आले तरी अश्रू पुसणारे जवळपास कोणी दिसेना, मन मोकळे करावेसे वाटले पण तेही घडले नाही आणि मग त्या क्षणी काय करतोय हे समजलेच नाही, वाटलं - आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही. पर्याय! काही नैसर्गिक आपत्तींचा अपवाद वगळता आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. स्वत: घडवून आणणाऱ्या गोष्टींना तर असतोच असतो. आत्महत्या म्हणजे स्वतःच स्वतःच्या जिवाचा अंत घडवून आणणे. एखादी व्यक्ती आत्महत्येला पर्याय आहे । १२७