पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अपयशाचा पाढा वाचत बसण्याऐवजी यश कसे मिळविता येईल याचे धडे गिरवावेत. एका गृहस्थाने ऐन उमेदीत व्यापार जोमाने सुरू केला. पण वयाच्या एकविसाव्या वर्षीच व्यापारात नुकसान सोसावे लागले. व्यापार बंद करावा लागला. वयाच्या बावीसाव्या वर्षी त्या व्यक्तीने विधिमंडळाची निवडणूक लढविली. त्यातही अपयश आले. खचून न जाता पुन्हा व्यापारात लक्ष घातले. पण एकदोन वर्षांत पुन्हा खोट आली. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी आणखी एक संकट कोसळले. पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रचंड मानसिक आघात झाला. 'डिप्रेशन' या मानसिक आजाराला सामोरे जावे लागले. यातून कसेबसे सावरून वयाच्या चौतिसाव्या वर्षी पुन्हा निवडणूक लढवली. पुन्हा हार पत्करावी लागली. वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी सिनेटची निवडणूक लढवली. त्यातही जीत झाली नाही. वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी पुन्हा विधिमंडळाची निवडणूक लढविली त्यातही अपयश आले. वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी उपराष्ट्राध्यपदासाठी प्रयत्न केला, त्यातही निवड झाली नाही. हा माणूस वयाच्या बावन्नाव्या वर्षी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. त्याचे नाव, 'अब्राहम लिंकन'. या व्यक्तीला आपण अपयशी म्हणू का ? माणसाजवळ संयम असायला हवा. 'हेही दिवस जातील' हा विचार त्यावेळी मनात असायला हवा. अपयश आले, अडचण आली, छोटीशी समस्या निर्माण झाली तर आपण खूप घाबरून जातो. आपली नजरच अशी भीतीयुक्त, शंकायुक्त होते की एखाद्या भिंगातून छोटासा किडा जसा अक्राळविक्राळ दिसतो तशी छोटी समस्या आपल्याला भलेमोठे संकट वाटायला लागते. आकाश कोसळल्याचा भास होऊ लागतो आणि मग आपण आणखी हतबल होतो. स्वत:लाच दोष देऊ लागतो. कधी कमनशिबी ठरवतो. स्वत:वर मनोमन टीका करतो. स्वत:च्या नजरेत स्वतःला कमी लेखतो. आत्मटीकेचे गंभीर स्वरूप म्हणजे आत्महत्या. काही लोकांना वाटते की, आत्महत्या केली की समस्या सुटेल. पण आत्महत्या करून मूळ समस्या तर सुटत नाहीच; पण आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मागे राहणाऱ्या आत्महत्येला पर्याय आहे । १२९