पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बादल्या भरभरून दररोज घरातून बाहेर फेकली जाते. भारतात जवळपास साडेबारा कोटी राहतात. म्हणजे सर्वसाधारणपणे पासष्ट लाख बादल्या भरून केरकचरा दररोज घराबाहेर फेकला जातो. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, यातला किती टक्के कचरा व्यवस्थितपणे कचराकुंडीपर्यंत जातो आणि त्याची नीट विल्हेवाट लावली जाते? किती कचरा पुन्हा वातावरणात मिसळला जातो? किती कचरा कचराकुंड्यांपर्यंत पोचतच नाही? किती कचरा कचराकुंड्यांतच दिवसेंदिव पडून असतो? या उघड्या कचऱ्याभोवती अनेक प्रकारची जनावरे काही खाण्यासाठी म्हणून गर्दी करतात आणि कचरा इतस्तत: पसरवितात. कचऱ्यात आणि रस्त्यावर घाण करतात. अर्थात मोकाट कुत्री आणि डुकरांबरोबर पाळीव गाई-म्हशी आणि गाढवांचीही संख्या लक्षणीय असते. कचरा वेळच्या वेळी उचलण्याबरोबर पाळीव प्राण्यांना मोकाट सोडू नये यासाठी कायदेशीर अंमलबजावणीची गरज आहे. कारण अशा प्राण्यांचे रस्त्यावर पडणारे मलमूत्र हे सार्वजनिक आरोग्याला बाधा आणणारे असते. पण हे कोणी लक्षातच घेत नाही. आज खेड्यांतील आणि उपनगरांतील बरेचसे प्रौढ आणि मुले उघड्यावर शौच् बसतात. खेड्यांत अजूनही सर्व घरांना शौचालये नाहीत. उपनगरांचीही अवस्था तीच आहे. पण ज्यांच्याकडे शौचालये आहेत त्या घरांतील शिकल्या-सवरलेल्या, जाणत्या(?) स्त्रिया आपल्या मुलांना बिनदिक्कतपणे घरासमोर किंवा शेजारी रस्त्याकडेला शौच्यास बसवितात. अनेक शहाणे-सुरते-सुशिक्षित लोक वाट्टेल तिथे रस्त्याकडेला जरासा आडोसा मिळाला की लघुशंका करतात. कोणी बघेल का असे काहीजणांना वाटते. म्हणजे, कुणी बघेल यासाठी ते सार्वजनिक ठिकाणी लघवीस उभे राहत नाहीत. जवळपास मुतारी, शौचालये उपलब्ध असताना केवळ आळसापोटी असे वागणारे कित्येक महाभाग आहेत. शहरी भागातील मुताय किंवा शौचालये यांना खरे तर स्वच्छतागृह म्हणतात; पण या स्वच्छतागृहात 'स्वच्छता' मात्र अजिबात नसते. या कारणामुळेही स्वच्छतागृहाबाहेर हे विधी उरकण्याकडे अनेकांचा कल असतो. १३४ | जगण्यात अर्थ आहे..