पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रस्त्यावर, , उघड्यावर कुठेही मूत्रविसर्जन, मलविसर्जन करू नये; त्यामुळे आपल्या एकट्याच्या नव्हे तर संपूर्ण समाजाच्या आरोग्यास धोका पोचतो याची पुसटशी जाणीव सुशिक्षितांनाही नसते याची खंत वाटते. महाराष्ट्राच्या अनेक भागांत डेंग्यूसारख्या आजारांचे थैमान चालते, शेकडोंचा बळी त्यात जातो. मलेरिया तर हळूहळू वाढतच आहे. फ्लू, सर्दी, हगवण, टायफॉईड, कावीळ हे आजार इतके नेहमीचे झाले आहेत की, ते सर्वांना होणारच; त्यांतून कोणाचीही सुटका नाही; अशीच सर्वांची गैरसमजूत झालेली दिसते. दूषित अन्न, दूषित पाणी, दूषित परिसर आणि स्वच्छतेच्या नियमांविषयी आपण दाखवत असलेली बेफिकिरी यांतच या आजारांची बीजे लपली आहेत हे आपण जाणून घेत नाही. पडलो आजारी की घ्या इंजेक्शन. पडलो आजारी की घ्या औषधे. पडलो आजारी की करा अॅडमिट. पडलो आजारी की लावा सलाईन पडलो आजारी की द्या अँटिबॉयॉटिक्स. आपण या दुष्ट चक्रातून बाहेर पडणार आहोत की नाही? आजारी पडणे, आजारी पडल्यामुळे आपले दैनंदिन काम ठप्प होणे, आजारी पडल्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होणे, औषधांवर पैसे खर्च होणे आणि या उप्पर आपली शुश्रुषा करण्यासाठी घरच्या मंडळींचा वेळ-पैसा - ताकद खर्च होणे म्हणजेच आपल्या स्वत:च्या नुकसानाबरोबर राष्ट्रीय मनुष्यबळ आणि पैशाचा अपव्यय नव्हे का ? पण याचा विचार कोणीही करीत नाही. सार्वजनिक स्वच्छतेची काळजी कोणी करीत नाही. स्वच्छतेस इंग्रजीत ‘हायजीन' (Hygene) असे म्हणतात. ग्रीक पुराणातील हायजिया या आरोग्यदेवतेच्या नावावरून हायजीन हा शब्द आलेला आहे. स्वच्छतेची व्याख्या अनेक प्रकारे करता येईल. आरोग्यपूर्ण जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व घटकांचा सम्यक अभ्यास करणारे आरोग्यशास्त्र म्हणजे 'स्वच्छता' होय. आरोग्यरक्षण आणि आरोग्यवर्धनाचे शास्त्र म्हणजे स्वच्छता होय. स्वच्छता कोणाला आवडत नाही? प्रत्येक सुज्ञ व्यक्तीला स्वच्छता आवडते. त्यासाठी ती जागरूक असते. पण ही स्वच्छता काही मर्यादेपुरती असते. म्हणजे व्यक्तिगत पातळीपर्यंत. स्वच्छता रक्तात हवी । १३५