पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कशासाठी? पोटासाठी! ‘माझं पोट आयुष्यात कधी बिघडलं नाही.' असे छातीवर (किंवा पोटावर) हात ठेवून सांगणारी व्यक्ती आपल्याला भेटली तर, 'तुमच्या पोटाच्या न बिघडण्याचं रहस्य काय ?' हा प्रश्न करून आपण तिच्या पोटात शिरण्याचा प्रयत्न नक्कीच करू. अर्थात अशी व्यक्ती आपल्या भारतभूमीत सापडणं जरी दुरापास्त मानलं तरी, जी व्यक्ती आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवते तिचे पोटासाठी किंवा पोटामुळे कधीच हाल होत नाहीत. पोटाचे हाल होऊ द्यायचे नसतील तर खाण्यापिण्यावरील नियंत्रणाबरोबरच शरीराची हालचाल ठेवणेदेखील महत्त्वाचे आहे. पित्त खवळले, पित्त वाढले अशा तक्रारी घेऊन अनेक व्यक्ती डॉक्टरांकडे येत असतात. पित्तविकार ज्यांना वारंवार होतो, कशासाठी? पोटासाठी! । १३७