पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आयुष्यात संकटे यावीत संकट.. कट....! हा एक शब्द उच्चारताच त्याची अनेक रूपे आपल्या डोळ्यांसमोर थैमान घालू लागतात. 'संकट येतंय' असे म्हटले तरी अनेक नको असणारे विचार आपल्या मनात घिरट्या घालू लागतात. जीवन जगायचे म्हटल्यानंतर संकटे ही येणारच. जीवनात जसे सुख मिळते, आनंद मिळतो, तसे दु:ख आणि संकटेसुद्धा येणारच. मात्र संकट आले की, मन घाबरून जाते; काही सुचत नाही; कशा कशात लक्ष लागत नाही... काय करावे? संकटाबद्दल विचार करताना प्रत्येक संकट म्हणजे एक भयंकर गोष्ट आहे' असे प्रत्येकाला वाटते आणि त्यामुळे किरकोळ सर्वसामान्य प्रश्नसुद्धा सारे आयुष्य व्यापून टाकतात. जर आपण काळजीखोर असू तर आयुष्यात संकटे यावीत । १३