पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एखाद-दुसऱ्या सलाईन-इंजेक्शनमुळे तक्रार थांबली की तिचे निदान करून न घेता, अनेक रुग्ण वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारतात. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या चाचण्या करून नेमके निदान करणे हे स्वास्थ्यकारक असते. भविष्यातील दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीनेही ते उचित ठरते. अपेंडिक्सचा दाह किंवा आतड्याच्या विकारामध्ये तातडीच्या शस्त्रक्रियेचीही गरज भासू शकते. पोटाच्या पोकळीत असणारे अनेक अवयव जेव्हा व्याधीच्या अधीन होतात त्यावेळी वेदनांची उत्पत्ती होते. तसेच त्या त्या अवयवांना अनुसरून इतर लक्षणेही दिसू लागतात. उदाहरणार्थ- कावीळ झाल्यावर पोटात दुखणे, मळमळणे, डोळे पिवळे होणे, लघवी पिवळी होणे अशी लक्षणे दिसतात. मूतखड्यामुळे असणाऱ्या पोटदुखीबरोबर लघवीची जळजळ असू शकते. मद्यपानाचा अतिरेक असेल तर स्वादुपिंडाचा दाह किंवा यकृताचा दाह ही कारणे पोटदुखीमागे असू शकतात. गोळी खाल्ल्यानंतर पोटदुखी थांबते हे अनेकांनी अनुभवले असेल. पण औषधाची गोळी खाल्ल्यानंतर पोटदुखी सुरू झाल्याची उदाहरणे कमी नाहीत. अनेक वेदनाशामक किंवा अन्य गटांतील औषधांमुळे पित्तविकार आणि पोटदुखीचे विकार उद्भवतात. एखादे वेदनाशामक औषध डॉक्टरांनी लिहून दिले आणि ते 'रामबाण' ठरले तर ती गुणकारी चिठ्ठी मेडिकल दुकानाच्या कौंटरवर ठेवून त्या औषधाचा अक्षरश: रतीब सुरू केला जातो. परिणामी अल्सरसारखे गंभीर विकार पोटात घर करतात. म्हणून एखाद्या गोळीचे जुजबी ज्ञान झाले तर तिचा गैरवापर स्वत:साठी अथवा इतरांसाठी करू नये. वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड आणि स्वप्नवत् अशी प्रगती होऊन अनेक अद्ययावत साधन-सुविधा आणि उपचारपद्धती उपलब्ध झाल्या आहेत. तरीही भारतासारख्या विकसनशील देशातील सर्वसामान्य माणसाच्या खिशाला ते सारे परवडणारे असतेच असे नाही. एकविसाव्या शतकातील आपल्या तेजस्वी भारतातील सामान्यांनांच नव्हे तर सुशिक्षितांनाही आरोग्यशिक्षणाची नितांत १४० । जगण्यात अर्थ आहे..