पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ । जगण्यात अर्थ आहे.. चला जगूया 'डॉक्टर, खूप औषधं झाली. दररोज एवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा 'एकच' शेवटची गोळी देऊन टाका. कंटाळा आलाय आयुष्याचा!” काही काही वेळा एखादा रुग्ण उद्वेगाने असे उद्गार काढतो. जोपर्यंत आपल्याला कोणतीही व्याधी त्रास देत नाही, तोपर्यंत आपण निर्धास्त असतो. ईश्वराने, निसर्गाने धडधाकट शरीर प्रदान केले आहे याचा आपल्याला विसर पडलेला असतो. जेव्हा एखादे दुखणे सुरू होते, तेव्हा 'त्या' अवयवाचे 'असणे' आपल्या लक्षात येते. कंबर दुखायला लागली की कंबर असल्याचे समजते. डोळे आले की दृष्टीचे महत्त्व समजते. गुडघ्यांचे दुखणे सुरू झाले की आजपर्यंत ते न करकरता (कुरकुरता) काम करत होते याची जाणीव