पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होते. हात कापू लागले की त्यांच्या (त्यापूर्वीच्या) कार्यकुशलतेचे नव्याने ज्ञान होते. विस्मरण होऊ लागले की आधीच्या उत्तम स्मरणशक्तीचे भान येते. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी, कोणता ना कोणता विकार त्रास देतो. विकाराची तीव्रता जितकी महत्त्वाची, तितकाच त्याचा कालावधीही महत्त्वाचा असतो. काही काळ आजारी पडून व्यक्ती त्या आजारातून उठली की पुन्हा नव्या जोमाने, नव्या उत्साहाने काम सुरू करते. तिच्याकडून 'दुप्पट वेगाने' काम सुरू होते. पण काही वेळा हे घडत नाही. कारण काही व्यक्तींच्या पाठी आजार लागतो, तो कायमचाच. व्याधीमुळे उद्भवणारी तक्रार कमी- अधिक झाली, तरी व्याधी मात्र कायमचीच चिकटते. अशा व्यक्तींची जीवनशैलीच अचानक बदलून जाते. व्याधीच्या प्रकारानुसार आणि स्वरूपानुसार रुग्णाचे जीवन सुसह्य होण्याच्या दृष्टीने त्याच्या दैनंदिनीतील बदल अत्यावश्यकच असतात; पण ‘मला हा विकार का झाला? मलाच कोणत्या कारणामुळे झाला? अमुक कारणामुळे झाला असावा का? तमुक केले असते तर ही व्याधी (ब्याद) टळली असती का?' वगैरे प्रश्नांची मनात गर्दी करून रुग्ण स्वतःचे आणि स्वत:भोवतीच्या अनेकांचे जीवन तात्पुरत्या कालावधीसाठी का होईना पण अस्वस्थ आणि अस्थिर करून टाकतात. अर्थात 'अशा' रुग्णांची संख्या तुलनेने कमी असली तरी त्या व्यक्तीसाठी आणि कुटुंबासाठी ही स्थिती अधिक त्रासदायक ठरू शकते. यासाठी कोणताही दीर्घकालीन त्रासदायक विकार जडला तरी, मनाला त्या व्याधीची झळ कमीत कमी पोहोचावी यासाठी प्रयत्नशील असायला हवे. शारीरिक व्याधी सुसह्य होण्यासाठी मनाला स्थिरता हवी. आज जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात बदल झाले आहेत, होत आहेत. अवघे जीवन गतिमान बनले आहे. या गतिमानतेचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनमानावर नकळत झाला आहे. खाण्या- पिण्यापासून दळणवळण, वातावरण, ध्वनी, भ्रमण आणि भ्रमणध्वनी ते थेट झोपण्याच्या पद्धती आणि वेळा यांवर लक्षणीय असा दर्जात्मक परिणाम झाला आहे. यांतूनच वयाच्या कोणत्याही चला जगूया | १४७