पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टप्प्यावर एखाद्या व्याधीचा प्रवेश संभवतो. व्यक्तीची 'जनुकीय स्थिती' दीर्घकालीन विकारांना कारणीभूत असते असे अलीकडच्या काही अभ्यासगटांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीस एखादा दीर्घकालीन विकार होणार की नाही, हे फक्त व्यक्तीच्या दैनंदिनीवर अवलंबून असते असे समजण्याचे कारण नाही; पण त्याच वेळी या बाबी कमी महत्त्वाच्या आहेत, असेही मानण्याचे कारण नाही. उच्च रक्तदाब, हृदयविकार, कार्डिओमायोपथी (हृदयाच्या स्नायूंची कार्यक्षमता कमी होणे), मधुमेह, दमा, सी.ओ.पी.डी., सांधेदुखी (मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी), पोटाचे दीर्घकालीन दुखणे, कंपवात, अपस्मार, मानसिक विकार, दीर्घकालीन डोकेदुखी, पायांचे दुखणे, सायनोसायटिस, सोरायसिस, अॅलर्जी, त्वचेचे विकार, कर्करोग, मूत्रपिंडाचे विकार, मूतखडा, पक्षाघात... अशा अनेक विकारांची यादी 'दीर्घकालीन विकार' या शीर्षकाखाली करता येईल. आपल्यापैकी अनेकांना यांपैकी एखाद्या विकाराचा 'अनुभव' असतो. आजाराच्या सुरुवातीच्या काळात निदान होऊन वेळीच उपचार सुरू केले आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचारांबरोबरच पथ्याचे पालन केले तर आपण विकारावर मात करू शकतो. एवढेच नव्हे तर, अशा विकारामुळे आपल्या दैनंदिनीत कोणताही अडथळा येत नाही. किंबहुना आपल्याच आजाराचा 'विसर' पडल्याचाही आपल्याला प्रत्यय येतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करते किंवा लक्षणांच्या बाबतीत चालढकल करते, तेव्हा त्या व्यक्तीला अशा विकाराची अधिक तीव्रतेने झळ बसते. एकदा का निदान झाले की 'उपचार आणि पथ्य' महत्त्वाचे. उपचारांच्या बाबतीत नियमितता आणि सातत्य राखले तरच त्यांचा फायदा होतो. काही व्यक्ती 'आपल्याला अमुक एक विकार आहे' हे कबूल करायलाच आधी तयार नसतात. जेव्हा काट्याचा नायटा होतो, तेव्हा मात्र डोळे खाड्कन उघडतात. बऱ्याचदा घडते असे की, एखादी व्यक्ती आजारी पडली आणि दोन-तीन दिवसांत तिला १४८ । जगण्यात अर्थ आहे..