पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बरे वाटू लागले नाही किंवा दुखणे वाढत चालले किंवा रुग्णालयात दाखल व्हायची वेळ आली तर एकदम ती निराश होते, हताश होते. हे केवळ ज्येष्ठ व्यक्तींच्या बाबतीत घडते असे नाही, तर युवकयुवतींच्या बाबतीतही घडते. ओक्साबोक्सी रडणे, चिडचीड करणे, औषधोपचार न घेणे, फेरतपासणीला न येणे, पथ्ये न पाळणे... अशा अनेक प्रकारे या व्यक्ती आपले दु:ख, नाराजी, निराशा, वैताग प्रकट करत असतात. काही व्यक्ती थोडे बरे वाटायला लागले की औषधोपचारांचे निर्णय स्वत:च घ्यायला लागतात. ही गोळी नको, ती घेऊयात, या गोळीने त्रास होतो, त्या गोळीने थोडे बरे वाटते... वगैरे निष्कर्ष काढून डॉक्टरांनी दिलेल्या डोसची पायमल्ली करतात. अनेकजण औषधांच्या बाबतीत काटकसरी असतात. दिवसातून दोन-तीनदा घ्यावयास सांगितलेली औषधे दिवसातून एकदाच घेतात. श्वासावाटे घ्यावयाची औषधे त्यांना गरज वाटल्यास घेतात. इन्शुलिनचा डोस हवा तेवढा कमी करतात. काहीजण त्याहीपुढे जाऊन दोन महिन्यांसाठी दिलेली औषधे खरे करताना एक महिन्याचीच घेतात आणि फेरतपासणीस आल्यानंतर 'सर्व औषधे वेळेवर घेतली बरं का!' असे ठामपणे सांगतात. अशा रुग्णांच्या तक्रारी कमी झाल्या नसतील तर काही वेळा आम्हा डॉक्टरांना त्यांच्या औषधाच्या वेळा, मात्रा यांविषयी त्यांची उलटतपासणी करावी लागते. औषधोपचार नीट, वेळेवर, नेमकेपणाने घेतले नाहीत तर व्याधी बळावते. बऱ्याचदा डॉक्टरांना इतर काही तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्या 'विनाकारण', वेळखाऊ आणि पैसेखाऊ ठरू शकतात. औषधांच्या साईडइफेक्टबाबत अनेकांना चिंता असते आणि ही चिंताच काहीवेळा आजारपणात भर टाकू शकते. 'अर्धे ज्ञान' खूपदा घातक असते. आपल्या आजारपणाबाबत संपूर्ण माहिती करून घेणे नक्कीच उपयुक्त असते. पण अशा माहितीमुळे विवंचनेत भर पड असेल तर मात्र ते उपयोगाचे नाही. यावरील चांगला तोडगा म्हणजे आपल्या 'फॅमिली डॉक्टर ना किंवा डॉक्टरमित्राला विश्वासात घेऊन याबद्दल माहिती करून घेणे. आजारावर मात करायची चला जगूया | १४९