पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असेल तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर विश्वास (आणि पाठोपाठ श्रद्धा) असणे हे आजार लवकर बरा होण्याच्या दृष्टीने निश्चितच महत्त्वाचे ठरते. पण 'विश्वास आणि श्रद्धा दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालली आहे. वारंवार डॉक्टर बदलणे हा काहीजणांचा आवडता छंद असतो. पण या छंदापायी आपल्या आरोग्याचे अतोनात नुकसान होते, हे विसरू नये. डॉक्टर बदलला की उपचार बदलतो. 'पॅथी' बदलली तर उपचारांची दिशाही बदलू शकते हेही लक्षात ठेवावे. अर्थात काही विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट विकारांच्या बाबतीत आयुर्वेदाचा, योगासनांचा फायदा होतो हे नजरेआड करून चालणार नाही. परंतु आयुर्वेदाच्या नावाखाली काही बुवा, भोंदू औषधाचा धंदा करताना दिसतात, त्याला बळी पडू नये. घरातील एखादी व्यक्ती दीर्घकालीन विकाराने त्रस्त असेल तर कुटुंबातील प्रत्येकजण अशा आजारी व्यक्तीसाठी काही ना काही करताना दिसतो. उपचारांच्या विविध प्रकारांना यामुळेच 'बाळसे प्राप्त होते. मग कुणीतरी उपचार सांगतो. कोणी काय तर कोणी काय...! अमुक ठिकाणी झाडपाला मिळतो, तमुक ठिकाणी अंगारा मिळतो, 'देशी' औषध मिळते, डोळ्यात थेंब घातले की डोळे क्लिअर ! एक इंजेक्शन घेतले की आजार गायब ! नुसत्या बोटाने ऑपरेशन. चांदण्या रात्री थाळीतून चंद्राकडे पाहायचे. देवीची नुसती ओटी भरायची. देवाला फक्त नवस बोलायचा. बाबांचे दर्शन घेतले की झाले. माने-पोटावर हात फिरवायचा अवकाश..., महाराजांच्या पायाचे दर्शन घ्यायचे, बाबांची सेवा केली की काम फत्ते. काही नाही, फक्त मासा गिळायचा, पुडीत औषध देतात तेवढे घ्यायचे; औषध दुधाबरोबरच घ्यायचे. गादी मिळते, त्या भारी गादीवर झोपले की दुखणे गायब. फक्त पौर्णिमेच्या रात्रीच जायचे, गुरुवारीच तुमच्या व्याधीवर उपचार... असे एक ना अनेक विचित्र-विसंगत प्रकार सभोवताली घडत असतात आणि कुटुंबातील व्यक्तीच्या प्रेमापोटी अनेक 'बिचारे' याला बळी पडतात. हकनाक आपला वेळ, पैसा आणि ताकद खर्ची घालतात. यांतून तो आजार बरा तर होत नाहीच, पण जेव्हा १५० । जगण्यात अर्थ आहे..