पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शब्दाखातर (नव्हे, पैशाखातर) मेडिकलसारख्या उच्च कॉलेजमध्ये शिकायला मिळते. उच्चपदस्थ अधिकारी होऊन 'काही तरी ' विकावे लागते. साधुसंतांचे जीवन हलाखीत, तर गुंड- बदमाषांचे जीवन संपत्तीत लोळण्यामध्ये जाते. अशांतीने भरलेल्या या जगात सुखापेक्षा दु:खाचे प्रमाण अधिक आहे अशी अनेकांची भावना होते. खरे तर दु:ख अनेक प्रकारांनी, अनेक रूपांनी प्रत्येकालाच भेटत असते. 'जन्म हेच मनुष्यजीवाचे पहिले दुःख असते. मनुष्य जन्माला आल्याबरोबर रडतो. आयुष्यभर दुःखे भोगून वा बघून रडतो आणि मरताना तर इतरांना देखील रडवून जातो.' असे रडणे अनेक जीवांना आणि जीवनांना कवटाळून बसले आहे. पैसा नाही म्हणून कुणी दु:खी तर कुणी अधिक पैसा आहे यास्तव दुःखी. कोणाला आईबाप नाहीत म्हणून दु:ख तर कोणी आईबापांमुळे दुःखी. कोणी अधिकार नाहीत म्हणून दु:खी तर कोणी अधिकारांमुळे दुःखी. कोणी उपाशी असल्याने दुःखी तर कुणी भरल्यापोटी दुःखी. अशा प्रकारे दुःख सर्वत्र भरले आहे. बाह्य जगातल्या या दु:खांतून आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो. पण बऱ्याचदा आपल्याला त्यात अपयश येते. याचे कारण म्हणजे आपण चुकीच्या दिशेने, चुकीच्या मार्गाने, चुकीच्या ठिकाणी सुखाचा शोध घेत असतो. याबाबतीत एक गोष्ट सांगितली जाते. एक म्हातारी आपल्या घरात सायंकाळच्या वेळी गोधडी शिवत बसलेली होती. दोरा ओवता ओवता तिच्या हातून सुई खाली पडली. ती सुई शोधू लागली. पण तिला ती सापडेना. रस्त्याने जाणारा एक मनुष्य दारासमोर थांबला आणि त्याने विचारले, “आजी तू काय शोधतेस?" “शिवताना सुई खाली पडली, ती शोधते आहे बाबा. " 66 " 'मग ती अंधारात कशी दिसेल? उजेडात बघ." असे म्हणून तो निघून गेला. म्हातारी बाहेर आली आणि उजेडात सुई शोधत बसली. तेथून येणाऱ्या जाणाऱ्यांनी तिची चौकशी केली. त्यातील काहीजण तिच्यासाठी सुई शोधत बसले. त्यानंतर आलेल्या लोकांनी जगण्यात अर्थ आहे । १९