पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ । जगण्यात अर्थ आहे.. काळजी घ्या, काळजी करू नका ‘कायss कसं काय चाललंय…..?’ हा प्रश्न आपण ज्यावेळी सहज म्हणून किंवा मुद्दाम एखाद्या व्यक्तीला विचारतो, त्यावेळी, 'आहे ठीक आहे...', 'बरं आहे....', 'चाललंय कसं तरी...', 'बरं हाय म्हणायचं...’, ‘आहे हे ठीकच आहे...', 'आलीया भोगासी असावे सादर...' अशी उत्तरे ऐकायला मिळतात आणि उत्तराबरोबर 'अशा चेहऱ्यावर' काही विशिष्ट रेघा आपोआप उमटतात. असा चेहरा विनाकारण ताणला गेलाय असे प्रश्नकर्त्या पाहणाऱ्याला वाटते. पण या प्रश्नावर 'अगदी छान. सुरळीत चाललंय...', 'मस्त चाललंय हो...', 'समाधान आहे बघा', 'झकास चाललंय...' अशा प्रकारची उत्तरे क्वचित ऐकायला मिळतात.