पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चिंतेमुळे काय काय होते हे स्पष्ट करणारी एक गोष्ट सांगितली जाते. , नेहमी चिंताग्रस्त असणारा एक गृहस्थ एकदा एका कल्पवृक्षाखाली बसला होता. त्याने कल्पना केली की, 'येथे आता पंचपक्वान्नाचे ताट माझ्यासमोर आले तर...?' ही कल्पना केल्यानंतर लगेचच त्याच्यासमोर असे ताट आले. त्यानंतर त्याच्या मनात आले की, 'आता भरपेट जेवण झाले. मला छानपैकी अंथरुण-पांघरुण मिळाले तर मस्त झोप काढता येईल. ' झाले. अंथरुण-पांघरुण, गाद्या - गिर्घा त्याच्यासमोर हजर. आता मात्र तो मनातल्या म घाबरला. त्याला वाटले की, 'ही बहुधा भुताटकी दिसते. हे भूत मला खाणार तर नाही...?' - आणि त्याच्यासमोर भूत निर्माण झाले आणि त्या भुताने त्या गृहस्थाला खाऊन टाकले. यातील एक गमतीचा पण महत्त्वाचा मुद्दा असा की, त्या ठिकाणी भूत निर्माण झाले नाही, पण भूत नावाची चिंता निर्माण होऊन त्याची हृदयक्रिया अचानक बंद पडली आणि बिचारा मृत्युमुखी पडला. ज्याप्रमाणे अत्यंत काळजी करणारी व्यक्ती संशयी आणि भित्री असू शकते, त्याप्रमाणे अजिबात काळजी नसलेली व्यक्ती अविचारी, वाट्टेल ते करणारी असू शकते. कोठेही, कोणतीही कृती करताना पुढचा मागचा विचार न करता, त्याच्या परिणामांचा विचार न करता अशी कृती अविचारी व्यक्तीच्या हातून घडते आणि त्याचे परिणाम त्या व्यक्तीला आणि बऱ्याचदा इतरांनादेखील भोगावे लागतात. आपण जर काळजी करत असू, चिंता करीत असू तर काळजी मनांत न राहता, ती चेहऱ्यावर दिसते. म्हणजेच काळजी जरी मनात असली तरी तिचे प्रतिबिंब चेहऱ्यावर दिसते, ते चेहऱ्यावरील हास्य हिरावून घेते. चेहरा दुःखी-सुतकी होतो. जर कर्त्या माणसाला काळजी असेल तर घरातल्या सर्वच व्यक्तींना ती ग्रासून टाकते. म्हणजे, कुटुंबप्रमुख किंवा कर्ता हा चिंतातूर, दुःखी म्हणून सर्वजण काळजी करतात. काळजी करणाऱ्या किंवा चिंतातूर असलेल्या व्यक्तीच्या सभोवतालच्या व्यक्तींवर त्याचा परिणाम होतो. अशा व्यक्तीच्या सानिध्यात काम करणाऱ्यांच्या कार्यक्षमतेतसुद्धा बदल होतो. ती कमी होते. २६ । जगण्यात अर्थ आहे..