पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकंदरीत चिंतेचा परिणाम प्रगतीवर होतो. हे सारे टाळण्यासाठी माणूस म्हणून जगताना नेहमी खरे बोलून, सत्कर्म, करून चेहऱ्यावर हसू ठेवून, संकटाला तोंड देऊन माणुसकी जपत, पैसा हे सर्वस्व न मानता जगावे. काळजी 'करण्या'पेक्षा काळजी 'घेणे' हे दीर्घायुष्याच्या दृष्टीने आवश्यक असते. अशा काळजीमुळे आपण स्वत:चे धोक्यापासून रक्षण करत असतो. इतरांना धोका होऊ नये याची दक्षता घेत असतो. शहाणा माणूस कॅन्सर होईल या भीतीमुळे तंबाखू, धूम्रपानापासून दूर राहतो. एडस्च्या भीतीमुळे वेश्यागमनापासून दूर राहतो. शॉक बसेल म्हणून विद्युतउपकरणापासून सुरक्षित अंतरावर राहण्याची काळजी घेतो. जीवनात अशा बऱ्याच गोष्टींबाबत काळजी घ्यावीच लागते, तरच जीवन सुखी आणि समाधानी होते. म्हणून मानसिक ताण टाळण्यासाठी, मन प्रसन्न राहण्यासाठी, कुटुंबातील शेजारील, ऑफिसमधील किंवा आपल्या संपर्कातील व्यक्तींना दु:ख न देण्यासाठी, आपली आणि त्यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी - वाढविण्यासाठी, सर्वांना आरोग्य-धन- प्रेम आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी, देदीप्यमान प्रगतीसाठी, स्वत:ला आनंद मिळण्यासाठी आणि इतरांना तो देण्यासाठी, जीवनातल्या छोट्या-मोठ्या गोष्टी करताना काळजी घ्यावी; काळजी करू नये. काळजी घ्या. काळजी करू नका । २७