पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ । जगण्यात अर्थ आहे.. बदलत्या काळाची गरज माणूस हा या पृथ्वीतलावरील जीव- सृष्टीतला एक पशूच आहे. माणूस हा सामान्य पशू नाही, तर तो एक विलक्षण पशू आहे. साय पशूंचे गुण या एकट्या माणसात कमी- अधिक प्रमाणात आढळतात. माकड हे फक्त माकड आहे. कुत्रा हा फक्त कुत्रा आहे. गाढव हे फक्त गाढव आहे. पण माणूस मात्र थोडा माकड, थोडा कुत्रा, थोडा गाढव... असा 'विलक्षण' आहे. आजच्या युगात माणसात कोणता ना कोणता पशू सतत दिसतो. पण त्याच्यात 'माणूस' मात्र क्वचितच आढळतो. खरे तर माणूस आणि पशू यांत किती फरक आहे? म्हटले तर काहीच नाही; म्हटले तर खूप मोठा. माणसामध्ये सतत बदल होत चालला आहे. चिमणी किंवा कावळा, वाघ किंवा ससा त्याच पद्धतीने वर्षानुवर्षे जगत