पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आलेले आहेत. पण प्रत्येक घटकेबरोबर माणसाची जगण्याची तन्हा बदलत आहे. आधुनिक होत आहे. माणूस हा प्राणी इतर प्राण्यांपेक्षा बुद्धिवान आहे. तो विचार करू शकतो; चिंतन-मनन करू शकतो. विचार व्यक्त करू शकतो. बोलू शकतो. तो समाजप्रिय आहे. त्याला जसे खावेसे वाटते, प्यावेसे वाटते, विश्रांती घ्यावी-झोपावे असे वाटते; त्याचप्रमाणे समाजात मिसळून राहावे असेही वाटते. समाजात राहण्यासाठी सामाजिक नियमांचे त्याला पालन करावे लागते. संस्कृतीनुसार वागावे लागते. समाजाच्या हितासाठी निर्माण केलेल्या चाली-रीती, रूढी किंवा नियम म्हणजे संस्कृती. संस्कृतीच्या पगड्यामुळे वयात येणाऱ्या मुला-मुलींची कुचंबणा होते. मुलाचे किंवा मुलीचे जसे वय वाढू लागते, तसे त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक बदल घडू लागतात. वयात आल्यानंतर विशिष्ट भावना निर्माण होणे, कामभावना निर्माण होणे ही निसर्गाचीच योजना असते. त्या वयात त्यांना या इच्छेबरोबरच त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयी माहिती मिळविण्याची उत्कंठा निर्माण होते. पण ‘शास्त्रोक्त माहिती' बहुतेकांना मिळत नाही. संकोचामुळे मुले पालकांना, आई-वडिलांना प्रश्न विचारीत नाहीत आणि पालकांना 'या गोष्टी मुलांना त्या त्या वेळी समजावून सांगणे इष्ट वाटत नाही. या वयातील मुले-मुली लैंगिक ज्ञानाविषयी त्यांच्या समवयस्क 'धीट' मित्र-मैत्रिणींकडे विचारणा करतात किंवा असे मित्र वेळोवेळी अशा विषयांची चर्चा करीत असतात. याशिवाय अशी माहिती सिनेमा, कादंबरी, अश्लील पुस्तके, दूरदर्शन आणि इंटरनेट यांमधून मिळते. या सर्व माध्यमांतून मिळणारी माहिती ही बऱ्याचदा अवैज्ञानिक, चुकीची, गैर असते. मुलांना शास्त्रीय माहिती तर मिळत नाहीच; पण कदाचित विकृतीला बळी पडणारी, कामवासना चाळविणारी भलतीच माहिती मिळण्याची शक्यता असते. प्रजोत्पादनाच्या इंद्रियांची वाढ झाली की नर-मादी यांच्यात लैंगिक आकर्षक निर्माण होणे बदलत्या काळाची गरज । २९