पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर्वत्र आढळतो. कोणताही देश असो, कोणताही समाज असो, कोणताही धर्म... कोणतीही जात... वर्ग...सर्वत्र अनैतिक लैंगिक वर्तणुकीचे प्रकार हे घडतच असतात आणि मग अशा वर्गात एड्ससारखा आजार होत राहतो; वाढत राहतो. अनैतिक वर्तणूक करणाऱ्या वर्गाचे प्रमाण जितके जास्त तितके एड्सचे प्रमाणही जास्त. अनैतिक वर्तणूक करणाऱ्या वर्गाचे अज्ञान, दारिद्र्य, अनारोग्य जितके अधिक, तितके एड्सचे प्रमाण अधिक. दुर्दैवाने भारत यात आघाडी घेत आहे. एड्समुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीत भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. २००५ च्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी एड्सने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जवळजवळ ४ लाख इतकी आहे. एड्सच्या चर्चेत असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा नंबर दुसरा लागतो. तिथे दरवर्षी ३ लाख २० हजार मृत्यू एड्समुळे होतात. अर्थात ही आकडेवारी 'यू एन एड्स' या जागतिक संस्थेची आकडेवारी आहे. याच संस्थेने भारतात जवळपास ५७ लाख रुग्ण असल्याची भीती व्यक्त केली आहे. पण शासन अर्थात नॅको (नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन) ही संस्था या आकडेवारीवर विश्वास ठेवायला तयार नाही. '२००४ मध्ये भारतात २८,००० जणांना एड्सचा संसर्ग झाला' या विधानावर यू एन एड्स या संस्थेने आक्षेप घेतला होता. २००५ मध्ये मात्र 'नॅको'ने त्या वर्षी नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या ७२,००० आहे असे सांगितले. अर्थात वास्तवातील संख्या याहून निश्चितच खूप अधिक आहे. एक वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून सांगली येथे प्रॅक्टीस करत असताना - म्हणजे रुग्णतपासणी, एड्सचे निदान, त्यावर यशस्वीपणे उपचार... हे करत असताना - केवळ सांगली जिल्ह्यातीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक रुग्णांचा अनुभव मिळाला. १९८६ ते २००६ या कालखंडावर नजर टाकली असता असे दिसून येते की, सुरुवातीच्या सहा-सात वर्षांत एड्सचे प्रमाण अगदी तळागाळातील वर्गात- म्हणजे झोपडपट्टीतील लोक, मोलमजुरी जबाबदार वर्तन । ३३