पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करणारे लोक, बांधकामावर बारीक-सारीक काम करणारे लोक, पोटासाठी भटकणारे खालच्या वर्गातील लोक आणि वेश्या यांच्यात - अधिक होते. नंतरच्या सहा-सात वर्षांत या आजाराने मध्यमवर्गीयांत शिरकाव केला. नोकरी करणाऱ्या व्यक्ती, किरकोळ व्यापारी, शेतकरी... आदी वर्गांत एड्स पसरला आणि त्यानंतरच्या सहा-सात वर्षांत त्याने उरलेल्या वर्गासही लक्ष्य केले. आज समाजातल्या प्रत्येक स्तरात एड्स आढळतो. - एड्स पसरविणाऱ्या अनेक कारणांमधील 'असुरक्षित लैंगिक संबंध' हे एकमेव कारण ९०% हून अधिक रुग्णांमध्ये प्रकर्षाने आढळते. या कारणास 'असुरक्षित' असे न म्हणता 'बेजबाबदार' असे म्हणावयास हवे. आजही समाजात ज्या ज्या ठिकाणी लैंगिक वर्तणूक बदलते-बिघडते, त्या प्रत्येक ठिकाणी जबाबदारीचे भानच नसते. अनेक व्यक्तींना - मग ती अशिक्षित असो वा सुशिक्षित - वाटते की, एड्स हा वेश्यागमनातूनच होतो. पण तो गैरसमज असतो. एड्स असलेल्या किंवा एड्सचा संसर्ग असलेल्या कोणत्याही व्यक्तीबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यास एड्सची बाधा होऊ शकते. एखादी व्यक्ती दिसते कशी, त्या व्यक्तीचा आर्थिक स्तर कोणता, त्या व्यक्तीचे शिक्षण किती, ती व्यक्ती कोणत्या घराण्यातील आहे... या बाबींवर ती व्यक्ती एड्सबाधित आहे की नाही हे ठरत नाही तर त्या व्यक्तीची लैंगिक वर्तणूक महत्त्वाची असते. बेजबाबदार लैंगिक वर्तणूक करणाऱ्यास कधीही एड्स होऊ शकतो. मगुरी, अति आत्मविश्वास, धाडस, मस्ती... इत्यादी गोष्टी एखाद्या व्यक्तीस बेजबाबदार लैंगिक वर्तणुकीकडे पावले टाकण्यास प्रवृत्त करतात. आज एड्स या रोगाचा आणि रोगावरील उपचाराचा विचार करता, परिस्थिती खूपच आशादायक आहे. एड्सवर असलेल्या औषधांच्या किमती पूर्वीपेक्षा तीन-चार पटीने कमी झाल्या आहेत. पूर्वी 'एड्स म्हणजे मृत्यू' असे समीकरण मांडले जायचे. आज याला 'दीर्घकालीन, काहीसा त्रासदायी विकार' असे म्हटले जाते. एड्सची शंका आल्याबरोबर कोणत्याही प्रकारच्या विचारांच्या गुंत्यात न अडकता, कसलाही न्यूनगंड न बाळगता तज्ज्ञाकडे ३४ । जगण्यात अर्थ आहे..