पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ । जगण्यात अर्थ आहे.. संसारात संशय नको संसार सुखाचा असावा हे प्रत्येक पती-पत्नीचे स्वप्न असते. बहुतेक जणांना विवाहापूर्वीची अनेक स्वप्ने व्यवहारातल्या जागेपणी विसरावी लागतात. तडजोड या गोंडस नामकरणानंतर स्वत:हून तो आणि ती विवाहबंधनात अडकतात. म्हणजे संसाराची सुरुवात होते आणि पुन्हा स्वप्नरंजन सुरू होते. 'आपण नीट संसार करायचा, एकमेकाशी भांडायचे नाही, प्रेमाने राहायचे, इतरांना आनंद द्यायचा...' असे उभयतांनी मिळून पाहिलेले गोड संसाराचे सुंदर चित्र काही कालावधीनंतर कटू भासत जाते, धूसर होत जाते. कालावधी... वर्षे, महिने किंवा काही काही संसारांच्या बाबतीत चक्क काही दिवसांनंतरच एकमेकांबद्दल वाटणारी आपुलकी, माया, प्रेम यांना अचानक ओहोटी ,