पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागते. सुरुवातीला वाटणारी ओढ नंतर निर्ढावलेले मन एकमेकापासून दूर ओढून नेते. प्रेमाच्या आणाभाका घेणारे दोन जीव केवळ नाव उच्चारल्यांनतर देखील एकमेकाचा जीव घेण्याची भाषा करतात. 'जीवन म्हणजे लढाई' हे शिकवणारे, शिकणारे शहाणे प्रसंगी एकमेकांविरुद्ध लढाईसाठी उभे राहतात. का? काही संसारांत हे सारे केवळ एका स्वभावदोषामुळे घडते. तो दोष म्हणजे संशय. प्रत्येक व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारच्या शंका आणि संशय नेहमी येत असतात. कारण, माणूस हा विचार करणारा प्राणी आहे आणि प्रत्येक क्षणी त्याच्या मनात कोणता ना कोणता विचार चालू असतो. 'माझे उद्या कसे होईल?', 'काही संकट येईल की काय?', 'माझा व्यवसाय नीट चालेल ना?’, ‘माझ्या घरी चोरी होईल की काय?', 'हाताखालचे नोकर मी नसताना नीट काम करतात की नाही?', 'ते पैशाची अफरातफर तर करत नाहीत?', 'माझ्या वरिष्ठांना माझे काम आवडते की नाही?', 'माझे सहकारी, बॉसना माझ्याबद्दल काय सांगतात?', 'ती माझ्याशी कशी वागते?', 'माझ्याबद्दल ती मैत्रिणींमध्ये काय बोलत असेल?'... या आणि अशा प्रकारच्या असंख्य शंका-कुशंका मनात डोकावत असतात आणि त्यांपैकी बहुतांशी व्यर्थ असतात. कारण त्यांचे निराकरणही लगेच होत असते. एखाद्या जवळच्या पण दूर असणाऱ्या व्यक्तीचा बऱ्याच दिवसांत फोन आलेला नसतो किंवा भेट झालेली नसते. मनात संशय शिरतो, ती व्यक्ती माझ्यापासून दुरावली की काय? -आणि काही वेळातच त्याच व्यक्तीचा फोन येतो किंवा ती व्यक्तीच साक्षात समोर येते. सारे कसे नितळ होते. दैनंदिन व्यवहारातील अशा शंकांनी ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचे मन व्यापून जाते, त्यावेळी संशय ही त्या व्यक्तीची वृत्ती बनते. ती संसारात प्रवेशते त्यावेळी ती विकृती बनते. कारण ही संशयी वृत्ती पती-पत्नीच्या मनांना त्यांच्या जीवनात एकमेकांपासून शेकडो-हजारो किलोमीटर दूर नेऊ शकते. कारण संशयी व्यक्ती सद्गुणांपासून देखील दूर गेलेली असते. संशयी व्यक्ती ही बहुधा हट्टी, हेकेखोर असते. आपली मालकी, आपला हक्क दुसऱ्यांवर संसारात संशय नको । ४३