पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राग नावाचा रोग आज हिंसाचार, मारामारी, गँगवॉर, खून, हत्या, जाळपोळ, दंगल, संप, मोर्चे, बंद, लुटालूट, दरोडा इत्यादी शब्द दैनंदिन वापरातले बनले आहेत. कोणतेही वर्तमानपत्र उघडून पाहिले तर या प्रकारातल्या अनेक बातम्या त्यात दिसतात... नव्हे असतातच. किंबहुना आज-काल अशा प्रकारची बातमी वर्तमानपत्रात नसेल तर सर्वसामान्य व्यक्तीला चुकल्या - चुकल्यासारखे वाटेल. पूर्वी भयंकर वाटणारे हे शब्द आज गुळगुळीत, मुळमुळीत वाटू लागले आहेत. कारण अशा प्रकारची दृश्येच आपणासमोर घडताना आपल्याला प्रत्यक्ष पाहावी लागत आहेत. समाजाचे घटक म्हणून अशा घटनांकडे पाहताना आपण बोथट झालो आहोत. अशा प्रकारची एखादी घटना आपण सहजपणे नजरेखाली घालून, राग नावाचा रोग । ४७