पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना, सर्वदा अंगिकार नको रे मना, काम नाना विकारी नको रे मना, मत्सरु दंभभारु / माणसाला येणारा क्रोध हा त्याचा पहिला शत्रू असतो. रागाच्या भरात आपण अनेकदा नको ते करून किंवा बोलून बसतो आणि त्यानंतर पश्चात्ताप करण्याची वेळ आपल्यावर येते. समर्थांनी सांगितले आहे की, 'हे मना, तू क्रोधापासून लांब राहा. नाहीतर नंतर खेद करण्याची पाळी तुझ्यावर आल्याशिवाय राहणार नाही.' क्रोधाच्या जोडीनेच द्वेष आणि अनेक रोगदोष निर्माण करणाऱ्या कामवासनेपासून दूर राहण्यास समर्थ बजावतात. क्रोध न येण्यासाठी शांतीचा, समाधानाचा देव मनी वसावा लागतो. आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांना हसतमुखाने सामोरे जाण्याची सवय करून घ्यावी लागते. याबाबतची एक गोष्ट आपल्याला बरेच काही शिकवून जाते. एका गावातील छोट्या नदीवर एक छोटा पूल होता. त्यावरून एका वेळी एकच जण जाऊ शकेल असा मार्ग होता. एके दिवशी, एकमेकांचे कट्टर वैरी असलेले दोन गृहस्थ एकाच वेळी पुलावर परस्परविरुद्ध दिशेकडून आले. माघार कोणी घ्यायची? प्रतिष्ठेचा प्रश्न होता. सुरुवातीला दोघेही अगदी मध्यापर्यंत येत राहिले. समोरासमोर येऊन माघार कोण घेतो हे अजमावत राहिले. शेवटी त्यातला एक म्हणाला, “मी मूर्खोंना वाट देत नाही." यावर दुसरा चट्कन म्हणाला, “पण..., मी देतो.” असे म्हणून तो माघारी आला. आपण आपल्या दैनंदिन जीवनात या दुसऱ्या माणसासारखी वृत्ती ठेवली तर राग हा औषधाला देखील राहणार नाही. रागावर सर्वोत्तम औषध म्हणजे मौन. या मौनाच्या क्षणी एक ते दहा अंक मोजावेत असे म्हणतात. पण एक ते दहा मोजण्यापेक्षाही चांगला उपाय असा की, ज्या वेळी एखाद्या व्यक्तीचा आपल्याला राग येतो, त्यावेळी आपोआप आपल्याला त्या व्यक्तीचे दुर्गुण-चुका डोळ्यांसमोर दिसू लागतात. त्यांच्याकडे लक्ष न देता, अशा व्यक्तीचे एक ते दहा चांगले गुण ५२ । जगण्यात अर्थ आहे..