पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शोध' घेताना जरूर व्हायला हवा असे मनोमन वाटते. मी अन् माझे कुटुंब, मी अन् माझे मित्र, मी अन् माझा व्यवसाय या सर्व पातळ्यांवर जगताना, वागताना, विचार करताना मी इतरांशी चांगला बोलतो का, मी चांगुलपणाने वागतो , मी इतरांना सुख - आनंद देण्याचा प्रयत्न करतो का, माझं असणं इतरांना हवंहवंसं वाटतं का... आणि सर्वांत महत्त्वाचे - माझा सर्वांशी सुसंवाद आहे का ? याची उत्तरे 'होय' अशी ज्याच्याकडे असतील तो सुखी आहे याबद्दल शंकाच नाही. का, ५८ । जगण्यात अर्थ आहे..