पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिणाम होतो. काळजीच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे खरं न बोलण्याची सवय. आपण कुणाशी काय खोटं बोललो याची आपल्याला काळजी लागते. लैंगिक सवयींमुळे देखील चिंता निर्माण होते. काळजीमुळे जीवन विकृत आणि आजारी बनते. काळजी करणारी व्यक्ती विकृत बनण्याची शक्यता असते. आजच्या काळात लैंगिक शिक्षण घेण्याची गरज आहे. आज एडस्चे भय वाढत आहे. त्याला टाळण्यासाठी या शिक्षणाचा उपयोग होणार आहे. मन:स्वास्थ्य, कुटुंबस्वास्थ्य आणि समाजस्वास्थ्य टिकविण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.' या विषयाची शास्त्रशुद्ध माहिती हवी. गावगप्पा नकोत. चेहरा हा मनाचा आरसा असतो. त्यामुळे चेहरा नेहमी हसतमुख ठेवावा. हसण्यामुळे शरीराला आपोआप अंतर्बाह्य व्यायाम मिळतो. 'हसा आणि लठ्ठ व्हा' असे वचनच आहे. मनुष्य हा एकच प्राणी हसू शकतो. संसार सुखाचा होण्यासाठीही त्यांनी काही सूचना केल्या आहेत. शंका आणि संशय ही वृत्ती बनली तर संसाराची शांतता बिघडायला वेळ लागत नाही. संशयी व्यक्ती स्वार्थी असते. अशी व्यक्ती आपल्या जोडीदाराला जखडून ठेवण्याचा प्रयत्न करते. त्याच्या एकनिष्ठतेबद्दल अविश्वास दाखविते. यातून भावनिक संघर्ष निर्माण होतो. तोड-फोड, मार-धोडही होऊ लागते. तेव्हा संशयाचे निराकरण करून संवाद साधणे हेच इष्ट ठरते. राग रोग कसा होतो याचेही विवेचन ते विस्ताराने करतात. ‘नको रे मना क्रोध हा खेदकारी' हे समर्थांचे वचन त्याना आठवते. 'तुम्ही सुखी आहात का?' हा प्रश्न सहसा आपण विचारीत नाही. स्वत:लाही विचारीत नाही. विचारायला वेळच मिळत नाही, इतके आपण स्वत:च्या संसारात गुरफटून गेलेलो असतो. अनेक वस्तूंची आसक्ती आपण सुखासाठी बाळगतो आणि तिला अंत नसल्याने निर्माण होते. भूत- दुःख भविष्यातली दु:खे आठवून आपण दुःखात सतत भर टाकत असतो. आपल्या ध्यानात येत नाही की, सर्वांशी सुखसंवाद करण्यात सुखाचे रहस्य दडलेले आहे. आजकाल मुलींना सौंदर्याच्या बाजाराची भुरळ पडलेली असते. त्यांना हे समजत नाही की, आपला आजचा समाज निरोगी नाही. मग या मुली टवाळखोर मुलांची शिकार बनतात. समाज निरोगी बनविण्यासाठी समाजातील