पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नजर सुंदर हवी आयुष्यात माणसाला ज्या निवडक गोष्टींचा वीट वा तिटकारा येत नाही, त्यांपैकी एक म्हणजे स्वत:चा चेहरा, दुसरे स्वत:चे शरीर आणि स्वतःचे सौंदर्य! त्यांकडे पाहण्याचा स्वत:चा दृष्टिकोन हे याचे कारण. प्रत्येक मनुष्य एका वेगळ्या दृष्टिकोनातून, स्वत:च्या 'नजरेने' स्वत:कडे, स्वत:च्या आयुष्याकडे पाहत असतो. मी कसा आहे, कसा दिसतो किंवा मी कशी आहे, कशी दिसते... पासूनच प्रत्येक व्यक्तीचा दिवस सुरू होतो. आरसा तर आज माणसाच्या जीवनातील अत्यावश्यक घटक बनला आहे; कारण त्याचा संबंध चेहऱ्याशी, चेहऱ्याच्या सौंदर्याशी येतो. माणूस आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत विचार केल्यास निसर्गाने मानवाला ज्या नजर सुंदर हवी । ५९