पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सावधान... शुभ मंगल ‘शुभमंगल सावधान!’ हे शब्द ज्यावेळी आपल्या डोळ्यांसमोर आपल्या कानांवर पडतात त्या वेळी जर आपण बोहल्यावर नसू वा बोहल्यावर पाऊल ठेवायची वेळ तोपर्यंत आपल्यावर आलेली नसेल तर या शब्दांचे आपल्याला फारसे गांभीर्य वाटत नाही. उलट ज्यावेळी हेच शब्द आपण स्वतः बोहल्यावर असताना कानी पडतात तेव्हा मनात विचारांची प्रचंड गर्दी झालेली असते. हे विचार नाना प्रकारचे असतात. नाना प्रकारे मनाला सैरभैर करून सोडत असतात. विचार ! निसर्गाने मनुष्यप्राण्याला बहाल केलेले एक वरदान! मनुष्य हा पृथ्वीवरील सर्वांत बुद्धिमान प्राणी. तो विचार करू शकतो, चिंतन करू शकतो, बोलू शकतो, हसू शकतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सावधान... शुभ मंगल । ६७