पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बुद्धीच्या नैसर्गिक वरदानामुळे तो आपल्या प्रवृत्तीला हवे तसे वळण देऊ शकतो. वंशसातत्य राखण्यासाठी निसर्गाकडून मिळालेल्या प्रजोत्पादन या गुणधर्माला देखील मनुष्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर वळण देऊन कामजीवनाचा आस्वाद इतर प्राण्यांच्या तुलनेने अधिक सुखकर केला आहे. माणूस आणि इतर प्राणी यांच्यातील या संदर्भातील एक महत्त्वाचा फरक म्हणजे प्राण्यांतील नरमाद्या प्रजोत्पादनासाठी एकत्र येताना शृंगाराचा आनंद जितक्या तीव्रतेने, संवेदनशीलतेने, विविधतेने घेतात त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीचे वैविध्य मनुष्यप्राण्याच्या शृंगारात असते. माणसाने कामक्रीडेच्या बाबतीत आपली बुद्धी आणि संवेदनशीलता यांचा सुरेख संगम केलेला आहे. लैंगिकतेतील मनुष्यप्राण्याइतकी विविधता इतर प्राण्यांत क्वचितच दिसत असावी. भारतीय संस्कृतीत कामजीवनाला उदात्तता बहाल केली आहे. सामाजिक आरोग्य टिकविण्याच्या हेतूने, सुखकर सहजीवन निर्माण व्हावे या भावनेतून विवाहसंस्कार जन्माला आला. विवाह म्हणजे स्त्री आणि पुरुष यांनी एका विशिष्ट संस्कारांनी एकमेकांना बांधील राहणे. विवाहामुळे या दोन अनामिक व्यक्तींमध्ये जवळीक निर्माण होते, सहवास घडतो. त्यातून प्रेम आणि विश्वास निर्माण होतो. एकनिष्ठतेतून कामजीवन आणि त्याद्वारे दीर्घकालीन आयुष्याच्या अंतापर्यंत सुखी सहजीवन या गोष्टी साध्य होतात. विवाह हा केवळ शारीरिक सुखासाठी नसतो, तर त्यात मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारीही अभिप्रेत असते. विवाहानंतर मुलांच्या पालकत्वाची, कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना एक पती, पिता तसेच पत्नी किंवा माता या भूमिकांबरोबरच एक जबाबदार नागरिक म्हणून । देखील यशस्वीपणे भूमिका पार पाडावी लागते. विवाह म्हणजे खरे तर बहुतेक व्यक्तींच्या आयुष्यातील जन्म आणि मृत्यू यांच्या खालोखाल सर्वांत महत्त्वाची घटना. जवळजवळ प्रत्येकाच्या बाबतीत घडणारी, घडविली जाणारी, मनात विचारांचे प्रचंड काहूर माजविणारी ही गोष्ट. पण दुर्दैवाने मनातील स्वत:च्या ६८ । जगण्यात अर्थ आहे..