पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कंटाळा टाळा - - - काय आज घरीच दिसताय! ऑफिसला दांडी का ? आज अभ्यास दिसत नाही, अभ्यासाला सुट्टी का ? अगं, हळदीकुंकवाचं विसरलीस का? बाहेर पडायची काहीच तयारी दिसत नाही? आजच्या व्याख्यानाला दोघंही येत नाही का? न्यू इअर्स सेलिब्रेशन सोडून अशी मरगळ का? अगं, एवढा मोठा सेल लागलाय आणि तुझा नन्नाचा पाढा ? या आणि यासदृश अनेक प्रश्नोद्गारांसमोर एक- दोन सुस्तावलेले शब्द प्रतिध्वनित होताना दिसतात- “राहू देत. कंटाळा आलाय...!" कंटाळा टाळा । ७३ -