पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माणूस'पण' मिळवा आजच्या व्यवहारी संगणकयुगात प्रत्येकाला एक प्रकारची घाई आहे; गडबड आहे; जास्तीत जास्त पैसा मिळविण्याची धडपड आहे. प्रत्येक लहान-मोठा उद्योगी गृहस्थ आपापल्या परीने कमी-अधिक धडपड करीत आहे. जगण्याच्या या 'बद्या' स्पर्धेत त्याला इतरांच्या बारीक-सारीक चिल्लर गोष्टींकडे लक्ष द्यायला फुरसत नाही. कारण तो आजच्या जगातला 'बिझी' माणूस आहे. माणूस हा प्राणी असा आहे की, तो निसर्गनियमांचे उल्लंघन करतो. नको ते खातो, नको ते पितो- नको तेवढे, नको त्यावेळी आणि नको त्या स्थळी! हा जगावेगळा प्राणी प्रचंड पैसा मिळवतो, साठवतो आणि कित्येकदा त्यासाठी आणि त्यासाठीच आयुष्य संपेपर्यंत धावत राहतो. माणूस 'पण' मिळवा । ७७