पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इतक्यात त्यांचा शिष्य आरसा घेऊन आला. महाराज म्हणाले, “धनाजी, हा आरसा म्हणजे पूर्वीचा काचेचा तुकडाच होता. याला एका बाजूने चांदी, लाख यांसारख्या पदार्थांचा लेप दिला गेला आहे. हा आरसा घे. यातून माझ्याकडे बघ.' >> धनाजीने आरसा हातात घेतला. विचारता झाला, “महाराज, यातून तुम्ही मला कसे दिसणार? यात तर माझीच प्रतिमा दिसते. मीच दिसतो. महाराज हसले. धनाजीला म्हणाले, “एकदा संपत्ती हातात आली की, माणूस त्याच नजरेने जगाकडे बघतो आणि मग त्याची अशी गत होते. माणसाला जग दिसतच नाही. त्याला जिथेतिथे तो स्वत:च दिसतो. म्हणून पैशाची स्वार्थी नजर काढून टाकायला हवी. कोणत्याही प्रकारचा मोह, लोभ, स्वार्थाचा लेप न देता मनाच्या काचेतून माणुसकीच्या पारदर्शकतेने जगाकडे पाहायला शिकावे. जगातील दुःख, वेदना मग सहजतेने दिसून येतात. त्यावर फुंकर मारावी. सर्वांना मदत करावी म्हणजे स्वत:साठी शांती आणि समाधान वेगळे शोधावे लागत नाही. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक महत्त्वाची असते. कारण व्यक्तीचे सुख हे मनाच्या सुखावर अवलंबून असते आणि मनाचे सुख हे कधी पैशाने विकत मिळत नाही. आपल्यापैकी अनेकजण या गोष्टी विसरतात आणि पैसा मिळवता मिळवता इतरांची मने मारतात. सग्यासोयऱ्यांच्या, आप्तेष्टांच्या मित्रांच्या आणि समाजातील अनेक स्वजनांच्या मनांतून उतरतात. त्यांच्यापासून दूर जातात, शरीराने आणि मनानेदेखील. आयुष्याच्या सायंकाळी अशा व्यक्तींकडे भरपूर पैसा असतो, संपत्तीची साथ असते, पण कोणी स्नेही नसतो, माणसांची संगत नसते. जीवनाचा अस्त होता होता या साऱ्या चुकांचा अर्थबोध होतो; पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. पैसा येईलही आणि जाईलही. पण जीवन कमी होत जाणार आहे. जीवन जाणार आहे; ते परत मिळणार नाही. याचा विचार आयुष्यात खूप आधी व्हायला हवा; तो होत नाही हेच दुर्दैव आहे. अमाप संपत्ती मिळविणे म्हणजे यश नव्हे. संपत्तीचे खरे मूल्य ती ज्या मार्गाने, ज्या पद्धतीने ८० । जगण्यात अर्थ आहे.. "