पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिळविली आहे त्या नैतिकतेवर अवलंबून असते. संत तुकडोजी म्हणतात, उत्तम व्यवहारे धन घ्यावे । उत्तम कार्यासाठी लावीत जावे। जेणे करून परस्परांचे कल्याण व्हावे। तैसेची कर ते व्यवहार ॥ पैसा, सोने, चांदी म्हणजे संपत्ती नव्हे. आयुष्य जगताना मिळविलेली माणसे हीच खरी संपत्ती असते. माणुसकी, माणूसपण हेच धन असते. आयुष्य जगताना पैसा हा लागणारच. तुम्ही तो अगदी जरुरीपुरताच मिळवा असे नाही. जास्त मिळवा, पण तो मिळवीत असताना कोणाला वेदना होतील, कोणाला पीडा-यातना होतील असे वर्तन होऊ देऊ नका. इतरांच्या मानसिकतेचा विचार करा. पैसा जोडा, माणसेही जोडा. म्हणून सांगावेसे वाटते, पैसा मिळविताना माणूस पण ' मिळवा. माणूस 'पण' मिळवा । ८१