पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ । जगण्यात अर्थ आहे.. देणाऱ्याने देत जावे दान म्हणजे काय ? दान म्हणजे देणे, दा (ददाति) या धातूवरून 'दान' या मूळ संस्कृत शब्दाची निर्मिती झाली आहे. एका व्यक्तीची संपत्ती विनामोबदला दुसऱ्याच्या मालकीची होण्याच्या प्रक्रियांपैकी महत्त्वाची एक प्रक्रिया म्हणजे दान. या व्याख्येतील 'विनामोबदला' हा शब्दप्रयोग लक्षात घेण्यासारखा आहे. आजकाल सभोवतालच्या वातावरणात होणारे बदल वेगवान झाले आहेत. म्हणजे वृक्षांच्या जागी इमारती, इमारतीतील पॉश कार्यालये (सॉरी, ऑफिसेस), तेथील हाय- फाय वातावरण, ऑफिसातील माणसे-पोरे यांच्या बुडाखाली तितक्याच पॉश गाड्या, या गाड्यांच्याखाली गुळगुळीत रस्ते, वगैरे... वगैरे...! यातल्या प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. म्हणूनच आज कोणतीही गोष्ट