पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विनामोबदला मिळत नाही. शिक्षणासारखी पवित्र गोष्ट, जी दिल्याने वाढते असे आपण लहानपणापासून शिकत आलो तीसुद्धा घसघशीत मोबदल्याशिवाय मिळत नाही. अशा वातावरणात दान हे तरी त्याच्या मूळ अर्थाशी इमान राखून कसे असेल? साऱ्या गुळगुळीत वातावरणात ‘दान’ वगैरे शब्दांचे अर्थ कालमानानुसार बदलले आहेत, बदलवले आहेत. दुर्दैवाने याही बाबतीत मोबदला मिळाला तर दान अशी प्रवृत्ती वाढत आहे. 'नाम के वास्ते' किंवा इतर कोणत्या तरी रूपाने दात्याने मोबदला वसूल केलेला असतो. कोणतेही दान निरपेक्ष असले तर त्याचे महत्त्व आहेच, परंतु शारीरिक घटक किंवा अवयवांच्या बाबतीतील दानाचे महत्त्व वर्णनापलीकडचे असते. कर्ण त्याच्या दानशूरपणामुळे अमर झाला आहे. त्याने आपल्या देहाचे संरक्षक कवचही दान म्हणून द्यायला मागे-पुढे पाहिले नाही. अवयवदानाच्या रूपाने अगदी गरीब व्यक्तीही अफाट श्रीमंतीचे दर्शन घडविणारे कार्य करू शकते. शारीरिक घटक किंवा अवयवांच्या बाबतीत 'दाना' चा विचार करता, याचे दोन भाग करता येतील. एक भाग म्हणजे जिवंतपणी केलेले किंवा प्रत्यक्ष करावयाचे दान आणि मृत्यूनंतरचे दान. रक्तदान किंवा जिवंतपणीचे अवयवदान हे पहिल्या प्रकारात मोडतात तर देहदान किवा मृत्यूनंतरचे अवयवदान हे दुसऱ्या प्रकारात मोडते. रक्तदानाच्या बाबतीत परिस्थिती आजही आशादायक आहे. मनाला दिलासा देणारी आहे. अनेक रक्तदाते स्वयंस्फूर्तीने नियमित रक्तदान करत असतात. कसल्याही प्रसिद्धी - अटी- मोबदल्याशिवाय त्यांचे काम अखंडपणे सुरू असते. अनेक स्वयंसेवी संस्था १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, संस्थेचा वाढदिवस, नेत्याचा वाढदिवस अशा निमित्ताने रक्तदानाचे पवित्र कार्य घडवून आणत असतात. रक्तदानाबाबतची ही गोष्ट अभिनंदनीय असली तरी या रक्तदात्यांनी आणि संस्थांनी रक्तपेढीची गरज आणि पूर्तता यांचा विचार करायला हवा असे मात्र सुचवावेसे वाटते. होते काय, की राष्ट्रीय सणासुदीला रक्ताच्या पिशव्यांनी रक्तपेढी खचाखच भरते. गरजेपेक्षा जास्त देणाऱ्याने देत जावे | ८३