पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साठा वाढतो आणि महिन्याभरानंतर रक्तपेढीला रक्ताची चणचण भासायला लागते. म्हणून रक्तदात्यांनी आणि संस्थांनी ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन रक्तपेढ्यांच्या आवश्यकतेनुसार ठरावीक काळाच्या अंतराने रक्तदान शिबिरे घ्यावीत. रक्तदात्यांनी त्यांना वाटणाऱ्या विशेष प्रसंगाच्या निमित्ताने संकल्प करावा आणि प्रत्यक्ष रक्तदान मात्र रक्तपेढीच्या हाकेनुसार करावे. रक्तदात्यांची सूची आणि त्यांचे दूरध्वनी, भ्रमणध्वनी यांची यादी रक्तपेढीत द्यावी. जेणे करून रक्तदात्याला पाचारण करता येईल. रक्तपेढ्यांची गरज पाहता अजूनही रक्तदात्यांची संख्या वाढवायला हवी. 'रक्तदान केल्याने शरीरातील रक्त कमी होते' हा रक्तदानाबाबत एक सार्वत्रिक गैरसमज आहे. रक्तदानाबाबत दुर्दैवाने आजही असे अनेक गैरसमज आहेत, भीती आहे आणि बऱ्याच अंशी अनास्थाही आहे. काही वेळा रक्तदान करण्याची इच्छा अनेकांना असते, पण ते कधी आणि कशासाठी करायचे या विषयीच्या कल्पना अस्पष्ट असल्याने गाडी पुढे सरकत नाही. अशा व्यक्तींना आवाहन केल्यास रक्तदान घडते. एक वर्ग असा आहे की, तो आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी, नातलगांसाठी वाट्टेल ते करायला तयार असतो पण 'कुणासाठी तरी' हे शब्द त्याच्या कोशात नसतात. याहीपेक्षा अगदी पुढचा मामला असतो तो म्हणजे अगदी रक्ताच्या नात्यातील व्यक्ती अत्यवस्थ झाली तरी रक्तदानासाठी पुढे न येणाऱ्या महाभागांचा. काही रुग्णांना जशी रक्ताची गरज असते तशीच इतर गरजा असणारेही रुग्ण असतात. भाजलेल्या रुग्णांना त्वचारोपणाची आवश्यकता असते. मूत्रपिंड निकामी झालेल्या व्यक्तींना मूत्रपिंडाची आवश्यकता असते. डोळ्यांवरील नेत्रपटलांमुळे (Comea) अंधत्व आलेल्यांना नेत्रपटलाची म्हणजे कॉर्नियाची गरज असते. 'दान' स्वीकारणाऱ्यांचा विचार करता, या सर्व प्रकारच्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करून या अवयवांचे रोपण करावे लागते. अशा शस्त्रक्रिया महागड्या असल्याने समाजातील बराचसा वर्ग अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांचा विचारच करू शकत नाही. समजा, शस्त्रक्रियेसाठी 'पैसा' उभा केला तरी अवयवदान करणारी व्यक्ती ८४ । जगण्यात अर्थ आहे..