पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहाराचा परिणाम आहार घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्याला त्रासदायक ठरू शकतो. त्यासाठी अशा भक्षकापासून दूर राहणे अधिक इष्ट. जाताजाता एक शास्त्रीय सत्य : भारतात पांढररोग म्हणजे अॅनिमियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींची विशेषतः स्त्रियांची (त्यात पुन्हा ग्रामीण) संख्या खूप मोठी आहे. अॅनिमिया व्हायचे एक कारण म्हणजे आहारात लोह कमी असणे. यासाठी एक मंत्र आत्मसात करावा. भाकरीबरोबर किंवा चपाती-पोळीबरोबर भाजी न खाता भाजीबरोबर 'भाकरी - पोळी' खावी. म्हणजेच आहारात भाजीचे - भाज्या, पालेभाज्या, मोड आलेली धान्ये - कडधान्ये - यांचे प्रमाण जास्त असावे. - आपण जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो याचा नव्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण सिनेमा, टीव्ही, कॉम्प्यूटरच्या या कलियुगात जे खायचे असते तेच खावे. प्यायचे असते तेच प्यावे. निसर्गाने जे नियम घालून दिलेत, ते आपल्या हट्टासाठी, मोहासाठी, जिभेचे चोचले पुरविण्यासाठी तोडू-फोडू नयेत; हे घसा फोडून सांगावे लागते. कारण जे लोक वाट्टेल ते आणि वाट्टेल तेवढे खातात नि पितात, त्यांना शारीरिक स्वास्थ्य तर मिळत नाहीच; पण मानसिक स्वास्थ्यासही मुकावे लागते. असे बिघडलेले स्वास्थ्य त्या व्यक्तीच्या वैयक्तिकच नव्हे तर कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ्यालाही सुरुंग लावते. अशा व्यक्तींच्या बाबतीत कळकळीने सांगावयाचे झाले तर (कविवर्य विंदा करंदीकरांची माफी मागून) सांगता येईल - खाणाऱ्याने खात जावे पिणाऱ्याने पीत जावे खाता- पिता एक दिवस सर्वार्थाने रिते व्हावे असे म्हणतात की, चौऱ्याऐशी लक्ष योनींतून गेल्यानंतर आपल्याला मनुष्यजन्म मिळतो. मनुष्यजन्म हा सर्वश्रेष्ठ जन्म आहे. मानवी जन्म हीच आपल्याला ईश्वराकडून मिळालेली सर्वांत मोठी देणगी आहे; अनामत आहे. ती आपण सांभाळायची, की वयाच्या तिशी-पस्तीशीतच खाणाऱ्याने खात जावे, पण...! । ८९