पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घराबाहेरील 'ती'चा ताण दिवसेंदिवस तणावग्रस्त स्त्रियांच्या संख्येत आणि ताणतणावाच्या तीव्रतेत वाढ होत आहे. बदलत्या काळाबरोबर ताणतणावाच्या कारणांची यादी वाढत चाललेली आहे. सर्वच स्त्रियांना थोडाफार ताणतणाव असतो, पण नोकरी करणाऱ्या स्त्रियांना घरातल्या स्त्रियांपेक्षा कित्येक पटींनी अधिक ताण असतो, हे कित्येकांना माहीत नसते. भारतासारख्या देशात, गेल्या काही वर्षांत स्त्री घराबाहेर पडू लागली आहे. शिक्षणाच्या वेगवेगळ्या वाटा तिच्यासाठी खुल्या झाल्या आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांत ती नेत्रदीपक कामगिरी करत आहे. उद्योगधंदा, व्यवसाय, वैद्यकीय, इंजिनिअरिंग किंवा आयटी अशा कोणत्याही क्षेत्रात ती पुरुषाच्या खांद्याला घराबाहेरील 'ती'चा ताण । ९९