पान:जपानचा इतिहास.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
अपानचा इतिहास.

 ऐनो लोकांची भाषा जपानी लोकांच्या भाषेहून बरीच भिन्न आहे. ऐनो भाषेत पुष्कळ शब्द व्यंजनांत येतात, व जपानी भाषेतील स्वरान्त असतात. ऐनो लोकांना पत्रव्य• वहाराचा उपयोग ठाऊक नाहीं.

 सामान्यत्वें ऐनो लोकांच्या आंगांत एक पोकळ आंगरखा असतो. त्या आंगरख्यावर कंबरपट्टा बांधलेला असतो. स्त्रिया व पुरुषही आपल्या तंगड्यांभोवती कातड्याचे अगर काप- पट्टे घट्ट आवळून बांधतात. त्यांच्यामध्ये पायांत जोडे किंवा वहाणा वगैरे कांहीं घालण्याची चाल नाहीं. हा एकंदर पोषाक उन्हाळ्याचा व पावसाळ्याचा झाला. हिंवाळ्यांत आणखी एक वरून हरणाच्या कातड्याचा अंगरखा, हातांत हात मोजे, व डोकीला उबदार अशी आणि कान व मान झांकून टाकील अशा तन्हेची टोपी घालतात. जपानी स्त्रियांप्रमाणें ह्या लोकांच्या स्त्रियांना काळोखाशिवाय किंवा एकांताशिवाय आपला एक पोषाक बदलून दुसरा घालतां येत नाहीं.

 ऐनो लोकांची घरें हलकी व लांकडांचीं बांधलेली अस- तात. त्यांना सभोवार बोरूचा कूड असतो. प्रत्येक घराला दोनच दारें असतात. एकाचा उपयोग दरवाजाप्रमाणें व दुसऱ्याचा खिडकीप्रमाणें करितात. भिंती शेजारी बाकें ठेवलेली असतात व त्यांवर जाड्या भरड्या चटया टाकलेल्या असतात, व त्यांचा बिछान्याच्या जागीं उपयोग करतात. धान्य वगैरे पुरवठ्याचे जिन्नस सांठविण्याचे कोठार घराजवळ पण पृथक असतें.