पान:जपानचा इतिहास.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
जपानचा इतिहास.

 साकीचा खप जपानामध्यें मनस्वी होतो. ती ते नेहमी केव्हांही प्यावयाची झाली तर ऊन करून पितात. तिच्या योगानें माद तात्काळ चढतो. दारू प्याल्यानंतर जपानी लोक आपला सुस्वभाव विसरून जातात, ( आणि कोण विसरून जात नाहीं ? ), व परकीयाविषयीं आपली अनादर बुद्धि यथेच्छ प्रगट करितात.

_______
प्रकरण ९ वें.
_________
जपानी लोकांतील लग्नसंस्कारांतील चाली.

 आमच्या देशांतल्याप्रमाणें जपानांत अर्भकांची लग्नें कर- ण्याची चाल नाहीं. मुलाचें वय सोळा व मुलीचें वय तेरा वर्षांचे होईपर्यंत बहुधा त्यांची लग्ने करीत नाहींतच. मुलगा अथवा मुलगी वयांत आली ह्मणजे त्याला अगर तिला बायको अगर दादला पाहून देणें हें आपलें कर्तव्य असें प्रत्येक आईबाप समजतात. त्या कामाकरितां एक मध्यस्थ हुडकून काढतात. तो मध्यस्थ असा असावा लागतो कीं, लग्न झाल्यावर पुढें त्यानें त्या उभयतां वधूवरांविषयीं फार काळजी बाळगावी व जोडप्यामध्ये एखादे वेळीं भांडण झाले तर त्यानें मिटवावें, असा मध्यस्थ मिळाला ह्मणजे मग़ वधूला किंवा वराला योग्य वर किंवा वधू शोधून पाहण्याचें काम त्याजकडे सोपवितात. इष्ट वधू किंवा वर जे काय आप- णास पाहिजे, त्याप्रमाणे सोईचें दिसून आलें ह्मणजे हा मध्यस्थ, वधूवरांना एकमेकांना पाहण्याची व क्वचित् प्रसंग बोलण्याचीही संधि देतो. ह्या दोघांच्या भेटीस ' अन्योन्य-