पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/118

हे पान प्रमाणित केलेले आहे.





मराठी माती नि मन

 बेळगाव आणि त्या भोवतालचा मराठी मुलुख राजकीयदृष्ट्या कर्नाटकात असला तरी त्याची माती आणि मन मराठीच आहे याची मला आलेली प्रचिती आपणाप्रत पोहोचवावी असे प्रकर्षाने वाटल्यावरून हा पंक्तिप्रपंच. बेळगावच्याजवळील कडोली, उचगाव, येलूर, माचीघर या परिसरात गेली बावीस वर्षे प्रतिवर्षी मराठी साहित्य संमेलन भरत असते. पूर्वेला अद्याप न भरल्याने प्रथमच दि. २४ डिसेंबर २००६ रोजी सांबरा गावी साहित्य संमेलन संपन्न झाले. काही अपरिहार्य कारणांमुळे पूर्वनियोजित अध्यक्ष येऊ न शकल्याने अध्यक्षपदी माझी वर्णी लागली. त्यात माझ्या योग्यतेपेक्षा सीमावासियांच्या मराठी माणसांविषयीच्या सहजस्नेहाचा भाग मोठा होता.

 सांबरा येथे संपन्न झालेले मराठी साहित्य संमेलन तिथल्या माय मराठी संघाने आयोजित केले होते. स्वागताध्यक्ष दिलीप चव्हाण व त्यांचे सहकारी कार्यकर्ते यांनी मराठी प्रेमापोटी जीवापाड कष्ट घेऊन, पदरमोडी करून हे संमेलन यशस्वी केले.

 या संमेलनाची अनेक वैशिष्ट्य माझ्या लक्षात आली. सीमाबांधवांच्या मराठी प्रेम व अभिनयाचा कित्ता आपण गिरवायला हा. इथली सर्व साहित्य संमेलने लोकवर्गणीतून यशस्वी होतात. त्यांना सरकारी अनुदान असत नाही. आपल्याकडच्या संमेलनांचे शासकीय अनुदान बंद झाले तर ती भरतील का असं उगीच माझ्या मनात येऊन गेले, संमेलनाचे स्वरूप गावजत्रेसारखं उत्साही असतं. त्यात पोरं-टोरं, तरुण-तरुणी, आबाल-वृद्ध सारे सारख्याच उत्साहाने सहभागी असतात. ही संमेलने भरू नये म्हणून कर्नाटक सरकार भरपूर प्रयत्न करते. मराठी मन आणि माती त्यास पुरून

जाणिवांची आरास/११७