पान:जातिभेदविवेचन.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ व त्याने देवाला स्नान वगैरे घालून त्याची पूजा केली असली तरी भटजींची स्वारी आली ह्मणजे ते नवी पूजा बांधतात. ५. अशा प्रकारें जी जात आपल्या लोकांस देखील हिंदुधर्माचा पूर्ण लाभ होऊ देत नाही ती परदेशच्या लो- कांस त्या धर्मापासून काय हित करून देणार आहे? म्लेंच्छ व यवन हे केवळ धर्मबाह्य आहेत, त्यांच्याविषयीं जात कांहीच काळजी करीत नाही. गोंड, खोंड, वाघरी, कोळी इ० ज्या हिंदुस्थानांतील जाती आहेत त्यांस वेदशास्त्र व पु- राणे यांपासून काय लाभ होत आहे ? “मनुकृत स्मृतिशास्त्र जो द्विजाति पठण करितो तो नित्य आचारसहित होतो, व स्वर्गपद पावतो" ( मनु. १२. १२६.) ह्या वचनांत इतर सर्व जाति वर्ज केल्या आहेत. ६. जातीच्या नियमांप्रमाणे मिश्र जात शुद्ध जातींत मिळू शकत नाही, व नीच जात मिश्र जातींत किंवा उंच जातींत येऊ शकत नाही. जातीरूप डोंगरावरून पाहिजे तितकें खाली अधर्मरूप दऱ्याखोऱ्यांत पडावें व अधोगतीस जावें, परंतु खालून वर चढण्याचा व उन्नति पावण्याचा मार्ग ह्या जातिशास्त्राने करून ठेविला नाही. जर कोणी शूद्र किंवा अतिशूद्र साधुवृत्ति धरून चालतो अथवा लोकांस सदुपदेश व