पान:जातिभेदविवेचन.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाले, व जे सर्व जातींत सामान्य पदार्थ आहेत ते ज्या जातीला चांगले करितां येत नाहीत तींत तसेच राहिले, ह्मणून कित्येक जातींत लग्नकार्यात ब्राह्मण आचारी असल्या- वांचून स्वयंपाकाची भट्टी चांगली उतरत नाही. कुणब्याच्या घरची पोळी झटली झणजे बाजरीच्या भाकरीची धाकटी वहीण, आणि ब्राह्मणाची पोळी जशी काय रेशमाची वडी याचे कारण उघडच आहे. ब्राह्मणाची बायको कुणव्याच्या घरी जाऊन कुणबीण बाईच्या चुलीपाशी बसून पोळी करून दाखवील तरच त्या बिचारीला चांगली नाजुक पोळी भा- जतां येईल ना? कित्येक जातींस ब्राह्मणादिकांनी उकिर- ड्यावर टाकलेले उच्चिष्टावरून मात्र क्षीर, वगैरे पदार्थांची रुचि माहित आहे, पण ते त्यांस करितां येत नाहीत; कि- त्येकांस त्यांची नांवें देखील माहीत नाहीत. याप्रमाणेच वस्त्रालंकाराची सुधारणा होणे राहिले आहे. अमुक जातीने अमुक रंगाचें व अमुक प्रकारचे व अमुक प्रकारे वस्त्र नेसावे असे नियम असल्यावरून बहुत जातींत फारच अमर्याद रीतीचा पोशाक स्त्रिया व पुरुष करितात. कित्येक जातींत बायकांस चोळी घालण्याचा प्रति- बंध आहे, कित्येक जातींत बायका अंग भरून वस्त्र नेसत