पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०) जानकी स्वयंवर नाटक. वसिष्ठ०- राजा अजनंट्ना, आतां स्वस्थ अंतःकरणें करून वैस, जें ब्रह्म- लिखित आहे तेच सत्य होणार आहे. सीता राम विवाह या विश्वामित्राच्या योगानें निश्चित झाला आहे असे समज आणि तोच सिद्ध होईल. (असें ह्मणून त्या सह निघून जातो. (तदनंतर कोषानें व्याप्त झालेला कौशिक प्रवेश करितो.) विश्वामित्र० - वाहवा!! काय हा राजा मदांध या रविवंशांत उत्पन्न झा- ला आहे! मभु रामभद्रास पुत्र समजतो काय? हें केवटें अज्ञान; आ- णि शोकांत निमम होते काय हा चमत्कार पहा! (पश्चात्ताप पावून माझा हा महानू अपराध आहे. ज्याच्या करितां साक्षात् पूर्णब्रह्माने नि- गुण असती साकारत्व धारण केले. त्या पुण्यश्लोक नृप श्रेष्ठास मूर्ख ह्म- णालों तस्मात् मीच महा मूर्ख! कोपासारिखा दुसरा कोणी दुष्ट नाहीं. हें नारायणा, या पति शरणागताचें संरक्षण कर आणि या कोपरूपी महासर्पापासून याची मुक्तता कर (पुन्हां अयोध्येत काय चालले आ. हे तें ज्ञान दृष्टीने पाहून २- c ओवी. वसिष्ठे उपदेश केला ॥ तेणें राजा सुखी झाला॥ प्रधान आला न्यावयाला ॥ मजलागीं सत्वरें ॥१॥ ( इतक्यांत रूमंत प्रधान येतो. २ संमंत० - (व्याकुळ होऊन अंजनी गीत. काय करावें अनर्थाला॥ मुनिकोपुनिया बाहिर गेला ॥ परत येउनीवर नृपतीला ॥ देइल केंवि मुदें ॥ १॥ इट्वाकू नृपराज वंशीं ॥ कीर्ती विमला राहिल कैसी ॥ वाटेचिं- ता हे मानसीं ॥ काय करूं देवा ॥ २॥ ९ अकस्मात् विश्वामित्रास अग्रभागी पाहून.) हेविश्वामित्रच आहेत काय? त्या सारखे दिसतात तर खरें. आतां रथाचे अश्व लौकर हाकून त्यांस घेऊन आले पाहिजे. (असें हाणून त्याच्या संभिध जातो परंतु विश्वामित्र आवेशाने त्याकडेन पाहू