पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४था. घडल्या आहेत तशांत आली ह्मणजे जानकीच्या स्वयंवरी तुमची प्रतिज्ञा सत्य करावयास आलों असें नाहीं सहजगत्यां मंगलोत्सव अवलोकन क- रावा.ह्मणून आलों आहे. समजलेत आतां. ● प्रधान ०-९ मनांत पहा, काय राजांचें चातुर्य आहे तें. आतां या प्रतिज्ञा सं- कटांतून काय परमेश्वर पार पाडल तें खरें. ( अंग ध्वज राजा कडे वळून) राजेसाहेब आपण आतां प्रथमतां उठावें, आणि धनुष्य सज्ज करावें अंगध्वज०- प्रधानजी, आमचे क्षत्रिय कुळामध्यें जनन आहे त्याप्रमा- णें आह्मी चाप सज्ज करायें हें आपलें ह्मणणे बराबर आहे परंतु आज आ मची चातुर्थिक शीतज्वराची पाळी आहे हाणून अनुमान नाही तर आ- पल्या सूचनेची मार्गप्रतीक्षा केली नसती. प्रधान - ( मनांत हे राजे वस्त्रालंकत होऊन मोठ्या सभ्य येऊन बसले आहेत आणि वारंवार आप आपली शस्त्रास्त्रे सांवरीत आहेत परंतु प्रसंगी असे बोलतात करावें तरीकाय? ( उघड ) बरें असो. आतां सर्वास विचारलें पाहिजे ह्मणजे त्यांचा पराक्रम सहज प्रगट होईल (म- नापमुकुट राजाकडे वळून को महाराज! आपण तरी प्रतिज्ञेवर लक्ष द्या- वें विनंति ह्मणून इतकीच आहे. प्रतापमुकुट०- अहो प्रधानजी, तुझी ह्मणतां तें सर्व सत्य आहे परंतु क- रायेंत्तरी काय? कालपासून जो आमांश झाला त्यानें तर फारच बेजार केलें आतां आपल्या निमंत्रणा प्रमाणे जर रंगस्थळीं न यावें तर दिसण्यांन गौणत्व दिसणार यास्तव तें सर्व एकीकडे ठेवून कौतुक पाहण्याकरितां मा- त्र येऊन बसलो आहे. दुसरे काही नाहीं. प्रधान. १०- ( मनांत) याचेंही सामर्थ्य समजलें. आता हे जे गृहस्थ मोठ्या मौ- ढतेनें बसले आहेत त्यांस विचारावें झणजे झालें ( उघड) को अंगराज, आपण तरी इकडे लक्ष या. अंगराज०- प्रधानजी फार काय सांगावें समारें आठ पंधरा दिवस झाले म स्तक शुरुलाने मला अतिशय त्रस्त केलें आहे त्यास उपाय नाहीं. नाहीपेक्षाए- का क्षणांत चाप सज्ज केलें असतें. •प्रधान० - हँहँ ! आपण तसेच पराक्रमी आहांत बरें असो.अहो कुलिंदाधिप..